BNR-HDR-TOP-Mobile

Lonikand : केसनंद-थेऊर रस्त्यावर एका विहिरीत सापडले मानवी हाडांचे अवशेष असलेले गाठोडे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुण्याजवळील केसनंद-थेऊर रस्त्यावरील एका विहिरीत सापडलेल्या गाठोड्यात मानवी हाडांचे अवशेष सापडले. मानवी हाडांचे अवशेष सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत केसनंद गावाजवळील एका विहिरीत हे मानवी हाडांचे अवशेष असलेलं गाठोडं सापडले. प्राथमिक माहितीनुसार हे अवशेष एका महिलेचे असावे, असा अंदाज आहे.

लोणिकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद गावचे पोलीस पाटील पंडीत हरगुडे यांनी एका विहिरीत हे गाठोडे सापडल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता विहिरीतील एका कोपऱ्यात दगड बांधलेले गाठोडे सापडले.

पोलिसांनी ते बाहेर काढून पाहणी केली असता त्यामध्ये मानवी हाडांचा सांगाडा सापडला. सोबतच मंगळसूत्र आणि बांगड्याही आढळल्या. यावरून हे अवशेष महिलेचे असल्याचा अंदाज लावला जात आहे. हे अवशेष पाहता या घटनेला एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला असावा. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

HB_POST_END_FTR-A1
.