Pimpri : स्वाईन फ्लूचा तिसरा बळी

एमपीसी न्यूज – स्वाईन फ्लूने एका 43 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची या वर्षातील ही तिसरी घटना आहे.

काळेवाडी येथे राहणा-या 43 वर्षीय रुग्णाला 14 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने 15 ऑगस्ट रोजी त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना सोमवारी (दि. 20) त्यांचा  मृत्यू झाला. शहरात विविध रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झालेले 7 रुग्ण सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आजवर 74 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती, त्यातील 63 रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

थंडी, 100 अंश पेक्षा जास्त ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात जायला हवे. ही सर्व लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत. वेळीच योग्य सल्ला आणि उपचार घेतल्यास या जीवघेण्या आजारापासून निश्चित मुक्त होता येते. पावसाचे दिवस असल्याने या लक्षणांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहायला हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.