Talegaon Dabhade News : नगरपरिषदेच्या हद्दीत प्लास्टीक व थर्माकोल वापराला पूर्णपणे बंदी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत प्लास्टीक व थर्माकोलला पूर्णपणे बंदी असून शहरात बंदी असताना जर कोणी अशा वस्तू वापर करताना आढल्यास त्यास रूपये 5000/-  दंड भरावा लागणार असल्याचे नगरसेवक व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी यावेळी सांगितले. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी प्लास्टीक व थर्माकाॅलबंदी विषयी नियोजन करण्यासाठी शहरातील सर्व हाॅटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, व्यापारी, इतर व्यावसायिक दुकानदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींबरोबर विचार विनिमयासाठी नगरपरिषदेच्या हाॅलमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत प्लास्टिक व थर्मोकोल वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून याचे उल्लंघन कारणा-यांवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय आरोग्य समितीच्या विशेष सभेत घेण्यात आला.

नगर परिषदेची आरोग्य समितीची विशेष सभा सभापती किशोर भेगडे यांचे अध्यक्षतेखाली झाली.या सभेस नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,नगरसेवक  अरुण भेगडे पाटील, नीता काळोखे, संध्या भेगडे, काजल गटे, कल्पना भोपळे,व्यापारी असोशियांचे अध्यक्ष किरण ओसवाल, सागर शर्मा, निर्मल ओसवाल,भवरमल सोलंकी,हेमंत सोलंकी, विनोद ओसवाल, प्रमोद चौधरी आदि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी ”स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, आपलं तळेगाव” हि संकल्पना यशस्वी करण्यासाठी  व्यापा-यांनी आणि नागरिकांनी प्लास्टीक बंदी सारख्या निर्णयाला साथ द्यावी, असे आवाहन भेगडे यांनी यावेळी केले. तर आठवडे बाजारात आणि शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून अनधिकृतपणे आपला कापड विक्री, कटलरी विक्री तसेच किराणा व्यवसाय करणा-यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी काही व्यापा-यांनी केली. यासभेचे नियोजन आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले,मयूर मिसाळ यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.