Alandi News : मेंढ्या चारण्यावरून महिलेस कळकाच्या काठीने मारहाण

एमपीसी न्यूज – मेंढ्या चारण्यासाठी घेतलेल्या शेतात नणंदेने तिच्या मेंढ्या चारल्या. याबाबत महिलेने नणंदेकडे विचारणा केली असता नणंदेने महिलेला कळकाच्या काठीने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी खेड तालुक्यातील भिवरेवाडी येथे घडली.

याप्रकरणी मारहाण झालेल्या जखमी महिलेने तिच्या नणंदेच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने तिच्या मेंढ्या चारण्यासाठी भिवरेवाडी येथील रंगनाथ भीवरे यांचे पडीक शेत घेतले आहे. त्या शेतात फिर्यादी यांच्या आरोपी नणंदेने तिच्या मेंढ्या चारल्या. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली. त्यावरून नणंदेने कळकाच्या काठीने फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी यांच्या हातातील बांगड्या फुटून त्यांना जखमा झाल्या. तसेच हात, पाठीवर आणि डोक्यात दुखापत झाली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.