Hinjawadi News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी बाप लेकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेच्या भावासोबत वाद घालून वाद सोडविण्यासाठी आलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार सोमवारी (दि. 8) सकाळी सात वाजताच्या सुमारास बावधन येथे घडला.

सुनील तात्याबा कांबळे, प्रशांत सुनील कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ त्याची कार पार्क करत असताना आरोपींनी त्याच्यासोबत वाद घातला. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी महिला आल्या असता आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला मारहाण केली. त्यानंतर सुनील कांबळे याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.