Pune News : पितृपक्षात फळभाज्यांना मागणी नाही

मागील  आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांचे दर टिकून आहेत. मागणी वाढल्याने कांदा, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज – पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात काकडी, गवार, भेंडी, लाल भोपळा, घोसावळे या फळभाज्यांची चांगली आवक होत आहे. पण, त्याला पाहिजे तशी  मागणी नाही. त्यामुळे मागील  आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांचे दर टिकून आहेत. मागणी वाढल्याने कांदा, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडून पावसामुळे फळभाज्यांची तोडणी कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे  गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे.

 

बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. यामध्ये जवळपास 60 टक्के माल हलक्या प्रतीचा आहे. बाजारात त्याच्या प्रतिदहा किलोस 100 ते 150 रुपये तर दर्जेदार कांद्याला 200 ते 250 रुपये भाव मिळत आहे. रविवारी येथील बाजारात 80 ते 90 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, इंदौर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, तामिळनाडू येथून 4 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश व गुजरात येथून लसणाची 6 ते 7 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आलं 1000 पोती, टॉमेटो चौदाशे ते पंधराशे पेटी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, भुईमूग 150 पोती, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळाची 7 ते 8 टेम्पो, मटार 250 गोणी, घेवडा 3 ते 4 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, कांदा 80 ते 90 ट्रक, आग्रा व  इंदौर येथून प्रत्येकी 40 ते 42 टेम्पो  बटाट्याची आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 100-250, बटाटा : 250-300, लसूण : 550-1100, आलं : 250-350, भेंडी : 150-200, गवार : 300-400, टोमॅटो : 250-350, दोडका : 250-320, हिरवी मिरची : 200-400, दुधी भोपळा : 150-200, चवळी : 200-220, काकडी : 150-200, कारली : हिरवी 300-350, पांढरी 200-220, पापडी : 300-350, पडवळ : 180-200, फ्लॉवर : 150-200, कोबी : 80-140, वांगी : 150-200, डिंगरी : 200-220, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 300-350, तोंडली : कळी 200-220, जाड : 90-100, शेवगा : 500-700, गाजर : 140-180, वालवर : 250-300, बीट : 80-100, घेवडा : 300-400, कोहळा : 100-120, आर्वी : 180-220, घोसावळे : 150-180, ढेमसे : 200-220, पावटा : 250-300, भुईमूग शेंग : 350-400, मटार : 800-1000, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

कोथिंबीर, मेथी, पालक महाग

पावसामुळे पालेभाज्यांचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत आहे. रविवारी पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात वाढली. पण,  कोथिंबीर, मेथी आणि पालकची आवक कमी झाली. कोथिंबीर, मेथी, पालकच्या शेकडा जुडीच्या भावात सुमारे ४०० ते ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. कोथिंबीरची तब्बल दीड लाख जुडी, तर मेथीची ४० हजार जुडी इतकी आवक झाली.


पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :
कोथिंबीर : 300-1200, मेथी : 1400-1800, शेपू : 400-800, कांदापात : 800-1200, चाकवत : 500-800, करडई : 500-600, पुदिना : 300-600, अंबाडी : 500-800, मुळे : 1500-2500, राजगिरा : 800-1000, चुका : 800-1000, चवळई : 800-1200, पालक : 800-1200.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.