Maharashtra Corona Update : राज्यात तीन लाख तर मुंबईत एक लाखाच्या पुढे रुग्ण ; आज 5306 रुग्ण कोरोनामुक्त

Three lakh corona cases in state and over one lakh corona cases in Mumbai.

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण  सापडले आहेत. आज राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 3,00,937 वर गेली आहे. यापैकी 1,23,377
रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 1,65,663 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजवर 11,596 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 1186 नवे रुग्ण आढळले तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,00,350 एवढी झाली. तर आत्तापर्यंत 5,650 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज 144 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.85 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 144 मृत्यू हे मुंबई मनपा-65, ठाणे-1, नवी मुंबई मनपा-1, कल्याण-डोंबिवली मनपा-6,उल्हासनगर मनपा-1, भिवंडी-निजामपूर मनपा-3, वसई-विरार मनपा-8, रायगड-1, नाशिक-2, नाशिक मनपा-2, धुळे मनपा-1, जळगाव-1, पुणे-9, पुणे मनपा-16, पिंपरी-चिंचवड मनपा-7, सोलापूर-1, सोलापूर मनपा-4, रत्नागिरी-5, औरंगाबाद मनपा-4, लातूर-1, उस्मानाबाद-1, अमरावती-1, अमरावती मनपा-1, बुलढाणा-2 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज 5,306 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.5 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 15,22,564
नमुन्यांपैकी 3,00,937 नमुने पॉझिटिव्ह (19.76 टक्के) आले आहेत. राज्यात 7,40,884  लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45,552 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, भारतात तयार होत असलेल्या कोवॅक्सिन नावाच्या लशीची पहिली मानवी चाचणी येत्या ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 60 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यांना या पहिल्या चाचणी अंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लस टोचण्यात येईल. नागपूरमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.