Pimpri: पिंपळे गुरव, संभाजीनगर, आनंदनगर येथील तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

Three more test positive for coronavirus one each from Sambhajinagar, Anandnagar and Pimplegurav in Pimpri chinchwad

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील चिंचवड मधील संभाजीनगर, आनंदनगर आणि पिंपळे गुरव येथील तीन जणांचे रिपोर्ट आज (रविवारी) सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सकाळी आले आहेत.

त्यामध्ये चिंचवड मधील संभाजीनगर, आनंदनगर आणि पिंपळे गुरव येथील तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 27, 50 वर्षीय दोन पुरुष आणि 40 वर्षीय एका महिलेचा समावेश आहे.

महापालिका रुग्णालयात सक्रिय 65 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, शहरात 198 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 119 आणि महापालिका हद्दीबाहेरील 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील शहरातील चार जणांचा मृत्यू झाला असून 65 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.