Today’s Horoscope 07 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – बुधवार दि. 07 जुलै 2021

  • शुभाशुभ विचार – प्रतिकूल दिवस.
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – दुपारी 12.00  ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी 18.18 पर्यंत नंतर मृग.
  • चंद्र राशी –  वृषभ.

—————————————

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्च वाढत असला तरीही पैसा कमी पडणार नाही. आज भावनेच्या भरात कुणाला शब्द मात्र देऊ नका.

वृषभ- ( शुभ रंग- मरून)

आज तुमचे मनोबल उत्तम राहील. आज तुमच्यातील सकारात्मकता समोरच्या व्यक्तीस प्रभावित करेल तब्येत ठणठणीत राहील. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाचा मान राहील.

मिथुन– ( शुभ रंग- आकाशी)

आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत. काहींना दूरचे प्रवास घडतील. मित्रांना पार्टी द्याल.

कर्क -(शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज काही मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. संध्याकाळी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

सिंह – ( शुभ रंग- मोरपंखी)

उद्योगधंद्यात स्पर्धा वाढलेली असेल. जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या बातम्या येतील. अधिकारात वृद्धि होईल. घरगुती कामे दुर्लक्षीत होतील.

कन्या– ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतील. तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जातील.  सत्संगाने मानसिक बळ मिळेल. आज दानधर्म कराल.

तूळ – (शुभ रंग- क्रीम)

आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. विवाह विषयक बोलणी उद्यावर ढकला.

वृश्चिक-( शुभ रंग – लाल)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा विरोध मावळेल. तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. कार्यक्षेत्रात काही नव्या संधी चालून येतील.

धनु – ( शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवेल. काही जुनी दुखणी डोके वर काढणार आहेत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही येणी असतील तर मागायला लाजू नका.

मकर -(शुभ रंग- जांभळा)

लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. गृहिणींना घर सजावटीच्या काही वस्तू आकर्षित करतील. आज एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ – (शुभ रंग- चंदेरी)

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. मुले आज तुमच्या आज्ञेत असतील. गृहिणींना सासुबाईं कडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील.

मीन – (शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. काही वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.