Todays Horoscope 11 February 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार शुक्रवार, दि. 11.02.2022

  • शुभाशुभ विचार- 20 प. चांगला दिवस.
  • आज विशेष- सामान्य दिवस.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मृग.
  • चंद्र राशी – 17.06 पर्यंत वृषभ नंतर मिथुन.

_________________________

आजचे राशीभविष्य-

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

सकाळी पैशांनी भरलेले खिसे आज दुपारनंतर रिकामे होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चाला आवर घालायला हवा. आज शेजार्‍यांना तुमच्या मदतीची गरज भासणार आहे.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज दुपारनंतर अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. भावंडात काही व्यावहारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. पण यावर सुसंवादाने मार्ग निघेल. प्रिय पाहुणे घरी पायधूळ झाडातील.

मिथुन- ( शुभरंग- मोरपंखी)

काल पासून एखादी वस्तू हरवली असेल तर ती आज परत शोधा, दुपारनंतर ती सापडू शकेल. घरातील थोर मंडळी आज सामंजस्याने वागतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

कर्क-( शुभ रंग – डाळिंबी)

उद्योग व्यवसायात आज मनाजोगती धनप्राप्ती होईल. काही नवीन हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पळतील. आज दुपारनंतर असा एखादा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणार नाही. पैसा जपून वापरा.

सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)

आज हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे.

कन्या-( शुभ रंग – सोनेरी)

व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली करताना भागीदारांना विश्वासात घ्या. रखडलेली शासकीय कामे दुपारनंतर गती घेतील. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेला पैसा जपून वापरावा.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज मनाच्या द्विधा अवस्थेत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांनाही कमजोर समजू नका. घरात वडीलधार्‍या मंडळींच्या हो ला हो करून विषय संपवलेला बरा.

वृश्चिक- ( शुभ रंग- केशरी)

वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. आज धाडसाची कामे टाळा. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

धनु – ( शुभ रंग – चंदेरी)

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे दुर्लक्ष करा. वैवाहिक जीवनातील मतभेद संध्याकाळी निवळतील.

मकर- (  शुभ रंग- क्रीम)

तोंडावर स्तुती करणारी माणसे मागून कारस्थाने करतील, सतर्क राहा. आज फक्त आपला स्वार्थ बघा. मित्रांना पार्टी आज नको. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्‍याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आशादायी दिवस असून आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. संध्याकाळी सहकुटुंब मनोरंजन.

मीन – ( शुभ रंग – मरून )

आज रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. ऑफिस मधील महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा. गृहिणी स्वच्छतेचे मनावर घेतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.