Today’s Horoscope 15 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – सोमवार, 15 ऑगस्ट 2022, Today’s Horoscope 15 August 2022   

शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.

आज विशेष – स्वातंत्र्य दिन. संकष्ट चतुर्थी. (चंद्रोदय 21.39) शिवमुष्ठी – मूग.

राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा 21.07 पर्यंत, नंतर रेवती.

चंद्र राशी – मीन.

—————————————-

आजचे राशीभविष्य Today’s Horoscope 15 August 2022

मेष -(शुभ रंग -राखाडी)

आज स्वार्था कडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे होईल. तातडीचे प्रवास संभवतात.

वृषभ- (शुभ रंग – मरून)

आत्मविश्वासाने नवे उपक्रम राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

मिथुन (शुभ रंग- पिस्ता)

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहिल.

Raaga Palace: पिंपरी-चिंचवडकरांच्या उदंड प्रतिसादानंतर रागा पॅलेसचा आणखी एक बैंक्वेट हॉल शहरवासियांच्या दिमतीला

कर्क (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. उपासनेत खंड पडू देऊ नका.

सिंह  (शुभ रंग -चंदेरी)

आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. जरा डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन चालवताना डोक्यात विचारांची गर्दी नको.

कन्या- (शुभ रंग- पांढरा)

आज नोकरीच्या ठिकाणी हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करूनच कामे लवकर पूर्ण करू शकाल. थोडी चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. वैवाहिक जीवनात आज दोघात तिसरा येऊ देऊ नका.

Bhosale Pride : ‘भोसले प्राईड’मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त खास ऑफर, फ्लॅट बुकिंगवर स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी शुल्क माफ

Today’s Horoscope 15 August 2022

तूळ – (शुभ रंग – नारिंगी)

व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश निश्चित मिळणार आहे. आज तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.

वृश्चिक -(शुभ रंग – सोनेरी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कामापुरतेच बोलणे हिताचे राहील.

धनु- (शुभ रंग- निळा)

आज अथक परिश्रम यांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान राहतील. काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधण्याची कला आज तुम्हाला चांगली जमेल.

मकर -(शुभ रंग -आकाशी)

नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील. विनाकारण शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष घालू नका.

कुंभ – (शुभ रंग -जांभळा)

अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस आहे. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी बिनसण्याची शक्यता आहे.

मीन (शुभ रंग- क्रीम)

रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून विश्रांतीस प्राधान्य द्या.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी

फोन- ९६८९१६५४२४

(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.