Today’s Horoscope 16 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 January 2023
वार – सोमवार.
16.01.2023
शुभाशुभ विचार- करीदिन.
आज विशेष- करीदीन.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती 19.09 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-
मेष (शुभ रंग- पिस्ता)
केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न करा. आज दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

वृषभ (शुभ रंग- जांभळा )
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनातील काही मतभेद आज संध्याकाळी निवळतील. येणी असतील तर वसूल होऊ शकतील.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी )
आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. आपल्या प्रिय व्यक्तीस आज एखादी भेटवस्तू द्याल.

कर्क ( शुभ रंग- मोरपीशी)
घरगुती लघुउद्योग आज तेजीत चालतील. गृहिणी आज घर स्वच्छतेकडे लक्ष देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. आज आईच्या तब्येतीची विचारपूस करा.

सिंह (शुभ रंग- पांढरा )
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

कन्या ( शुभ रंग- क्रीम )
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांशी मदत घ्यावी लागेल. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी )
जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा आज प्रयत्न कराल तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलल्याने तुमचेच काही हितचिंतक दुरावतील. कुणालाही मोफत सल्ले देऊ नका.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा )
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडू शकतील. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. आज प्रवासात खाण्यापिण्यावर ताबा ठेवा, आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

धनु- (शुभ रंग- लाल )
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

मकर ( शुभ रंग- गुलाबी )
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेत यशस्वीपणे तोंड द्याल. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊ नका. आज मित्रांच्या फार नादी लागू नका.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी ) – Today’s Horoscope 16 January 2023
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.

मीन -(शुभ रंग – निळा)
कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करा नाकासमोर चाला. गैरवर्तनाने मानहानी आज संध्याकाळी फक्त सत्संगाकडेच पावले वळवणे हिताचे राहील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pune News: जी 20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा उद्या होणार प्रारंभ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.