Pune : दरीत ढकलून पत्नीचा केला खून, असा लागला खुनी पतीचा छडा

एमपीसी न्यूज – वयाने मोठी असणारी पत्नी घटस्फोट देण्यास तयार ( Pune) होत नव्हती. त्यामुळे पतीने पत्नीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्याने तिला सोबत घेतले. मांढरदेवीच्या दर्शनाला जायचे आहे असे सांगितले. कॅब करून दोघेही त्या ठिकाणी गेले. मात्र पतीने पत्नीला उंच डोंगरावर नेले आणि खाली ढकलून देत तिचा खून केला. त्यानंतर पत्नी बेपत्ता असल्याची त्याने पोलिसात तक्रारही दिली होती. तब्बल अडीच महिने तो पोलिसांना फसवत राहिला. मात्र अखेर बिंग फुटलं. पोलिसांनी त्याला अटक केली. संपूर्ण प्रकार लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला.

अमोलसिंग मुरली जाधव (वय 26, रा. फुलगांव, ता. हवेली) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. ललिता अमोलसिंग जाधव (वय 38) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी त्याला अटक केली.

Today’s Horoscope 16 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

ललिता ही अमोल सिंग पेक्षा बारा वर्षांनी मोठी होती.  ललिता सोबत अमोलने केवळ आई-वडिलांच्या आग्रहाखातर लग्न केले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून तो घटस्फोट घेण्याच्या तयारीत होता. मात्र ललिता घटस्फोट देण्यास राजी नव्हती. त्यामुळे त्याने तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. मागील वर् 28 ऑक्टोबर रोजी त्याने तिला मांढरदेवी येथे फिरण्यासाठी जायचे आहे असे सांगितले.

प्रायव्हेट टॅक्सी करून दोघेही मांढरदेवी परिसरात गेले. यावेळी आरोपीने टॅक्सी थांबवली पत्नीला घेऊन तो झाडी असलेल्या उंच डोंगरावर गेला. आणि बेसावध पत्नीला त्याने अचानक खाली ढकलले. ललिता खाली कोसळली मात्र झाडाझुडपात अडकून पडली. त्यानंतर अमोल खाली गेला आणि तिच्याच साडी ने गळा आवळून खून केला.

त्यानंतर अमोलसिंग यानेच पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिसांकडे नोंदविली होती. तपासासाठी तो स्वत: त्यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांबरोबर गेला होता. जाधव या मरकळ येथील इंन्प्रो प्रा. लि. कंपनीत कामाला आहे. त्या दिवशी तो दिवसभर कामाला असल्याचे कंपनीतील रेकॉर्डवरुन दिसून आले. त्याने आपला मोबाईल 15 दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले.

महिलेचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. पोलिसांनी अमोलसिंग याच्याकडे वारंवार चौकशी केली. त्याच्या बोलण्यात थोडी थोडी विसंगती दिसू लागली. त्यामुळे पोलिसांनी ते रहात असलेल्या परिसरात चौकशी केली. त्यातून पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला अन पोलिसांनी तो अमोलसिंग समोर धरला. त्याबरोबर तो गडबडला. अन खुनाची कबुली ( Pune) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.