Today’s Horoscope 22 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 22 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 22.03.2024

शुभाशुभ विचार- वृद्धी दिन.

आज विशेष – प्रदोष.

राहू काळ – सकाळी 10.30  ते  12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – मघा.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष- ( शुभ रंग- लाल)

आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. पैसा कमावण्याचे विविध मार्ग सुचतील.

वृषभ – (शुभ रंग- पिस्ता)

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न खूपच वाढवावे लागणार आहेत.

मिथुन – (शुभ रंग – पांढरा)

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेत तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त राहतील.

कर्क- ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज काही दुरावलेली नाती जवळ येणार आहेत.

सिंह – ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणाला मोफत सल्ले वाटप करू नका.

कन्या-  (शुभ रंग- चंदेरी)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधाल तर सापडेल.

तूळ – (शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात प्रगतीची चक्री गतिमान होतील. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. आज लांबचा प्रवास करत असाल तर सावध राहा.

वृश्चिक-  ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आळस झटकून कामाला लागल पण अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

धनु – (शुभरंग- केशरी)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

मकर – (शुभ रंग- मरून )

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका काढण्यासाठी टपून बसलेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे आज शक्य नाही. संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळवावी लागतील.

कुंभ – ( शुभरंग- डाळिंबी)

केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांती ही गरजेची आहे.

मीन – (शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील शब्द जपून वापरायला हवेत.

 शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.