Today’s Horoscope 27 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – गुरूवार.

27-04-2023

शुभाशुभ विचार- 14 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- गुरुपुष्यामृत सकाळी 7.00 नंतर सूर्योदयापर्यंत.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल- दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य.

चंद्र राशी – कर्क.

—————————————-

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- आकाशी )

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. प्रॉपर्टीचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या अज्ञात राहावे.

वृषभ (शुभ रंग- निळा )

ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. काही अति हुशार मंडळी आज भेटतील कमीच बोललेले बरे.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )

कार्यक्षेत्रातील नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज गृहिणी पाहुण्यांची उठबस आनंदाने करतील.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दास मान राहील व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज आर्थिक व्यवहारात सावध राहायला हवे. एकाच्या भरावशावर दुसऱ्याच शब्द देऊ नका. रात्रीच्या प्रवासात सावध राहा, आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यायला हवी.

कन्या ( शुभ रंग- हिरवा )

आज नोकरीच्या ठिकाणी काही मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्त्वाच्या बातम्या येतील.

Alandi : सिद्धार्थ ग्रुप आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. आज तुमच्या विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देता येतील.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)

नोकरी धंद्यातील काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आज हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचा मोह होईल पण तो टाळा. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

धनु- (शुभ रंग- मोरपिशी)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेही धाडस नको.

मकर ( शुभ रंग- केशरी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदाराच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे आवश्यक आहे.

कुंभ (शुभ रंग – मरून)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमस असेल. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर सौम्य होतील.

मीन -(शुभ रंग – भगवा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ राहील. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.