Today’s Horoscope 28 December 2022 -जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 December 2022 -जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – बुधवार.

28-12-2022

शुभाशुभ विचार- 14 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – शततारका 12.46 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा. 

चंद्र राशी – कुंभ.


आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- केशरी )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज मोठा भाऊ योग्य सल्ले देईल.

वृषभ (शुभ रंग- जांभळा )

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकाराचा वापर कराल. रखडलेली काही शासकीय कामे आज गती घेतील.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

आज कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला फार खोलात शरलात तर तुमच्याच अडचणी वाढतील.

कर्क (शुभ रंग- निळा)

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत. जे चाललंय ते बर चाललंय.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

सगळी महत्त्वाची कामे आज दुपार पूर्वीच उरकून घ्या. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. भागीदारीत देण्या घेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात असलेले बरे.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. तब्येत थोडी नारमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषय नको.

Maharashtra Karnatak Dispute : सीमा भागातील मराठी बांधवाना संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष सोईसुविधा

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील असाध्य आजारावर डॉक्टर अचूक निदान करतील.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही आज ठाम राहाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. गृहिणी घर सजावटी प्राधान्य देतील.

धनु- (शुभ रंग- भगवा)

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली  करा. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत ठरू शकतो घराबाहेर वावरताना राग अजिबात उपयोगाचा नाही.

मकर ( शुभ रंग- पांढरा)

आर्थिक व्यवहारात सतर्क असणे आवश्यक आहे आज अनावश्यक खर्च टाळा दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भावेल वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. हाताखालची मंडळी तुमच्या आज्ञेत राहतील. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा व अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा.

मीन -(शुभ रंग – क्रीम)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठांची पावले संध्याकाळी सत्संगाकडे वळतील.

 

 

   शुभम भवतु.

  श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.