Today’s Horoscope 7 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 7 September 2022

वार – बुधवार

तारीख 7- 9 – 2022

शुभाशुभ विचार – शुभ दिवस

आज विशेष – भागवत एकादशी

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल

आजचे नक्षत्र – उत्तराशाढा 16.00 पर्यंत नंतर श्रवण

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – सोनेरी)

आज नोकरीच्या ठिकाणी कामाचा प्रचंड ताण असेल.कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागणार आहे.आज अत्यंत व्यस्त दिवस.

वृषभ – (शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्हाला दैवाचे उत्तम पाठबळ असेल.तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची शंभर टक्के खात्री आहे.आज घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.सज्जनांचा सहवास लाभेल.

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)

हितशत्रु मित्रांमध्येच लपलेले असण्याची शक्यता आहे सतर्क रहा.कोणतीही धाडसाची कामे आज करू नका.आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवूच नका.

कर्क – (शुभ रंग – गुलाबी)

कौटुंबिक सदस्यात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल.अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ असणार आहे.

सिंह – (शुभ रंग – डाळिंबी)

आज कोणतीही गोष्ट सहज साध्य असणार नाही, तरीही तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ नक्की मिळेल.काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या – (शुभ रंग – मरून)

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल.आज मनसोक्त स्वतःचेच लाड कराल. नामांकित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील.नवोदितांना संधी चालून येतील.

तूळ – (शुभ रंग – पांढरा)

आज कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा विचार कराल.काही घरगुती प्रश्नात लक्ष घालावे लागेल.गृहिणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील. गृह उद्योगातून चांगली मिळकत होईल.

वृश्चिक – (शुभ रंग- मोतिया)

शेजार्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपास ते प्रवास घडण्याची शक्यता आहे आज क्रोधावर लगाम असलेला बरा.

धनु – (शुभ रंग – भगवा)

आज खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही.काही प्रिय पाहुणे आज घरी पायधूळ झाडणार आहेत.वक्त्यांची भाषणे प्रभावशाली होतील.नवविवाहितांना मनोवांच्छित संततीचा लाभ होईल.

मकर – (शुभ रंग – निळा)

आज तुम्ही जिथे चाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.अति उत्साहात घेतलेले काही निर्णय चुकणार आहेत.विवाह इच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको.संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल.उंची वस्तू खरेदी होईल.आज गरजेपुरते तरी आध्यात्मिक व्हाल.

मीन – (शुभ रंग – क्रीम)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून मनी योजाल ते तडीस न्याल. आज कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडू शकेल. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

शुभम भवतु :

श्री जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.