Pimpri : वृद्धाची सोनसाखळी हिसकावून दोन बसची तोडफोड

एमपीसी न्यूज – वृद्ध व्यक्तीला दमदाटी करत मारहाण करून गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच दोन बसची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री साडेअकरा वाजता अजमेरा पिंपरी येथे घडली.

बन्सी रंगनाथ जगधने (वय 60, रा. गवळीमाथा, भोसरी) यांनी याबाबत शनिवारी (दि. 31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल देवकर, महेश मांजळकर, विजय पवार, चीक्क्या जाधव, संतोष कट्टीमनी, सागर तांदळे (सर्व रा. नेहरूनगर, पिंपरी), अनिकेत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), विशाल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीच्या दोन बस आहेत. त्या बस अजमेरा पिंपरी येथील पिल्ले हॉल समोर पार्क केल्या होत्या. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता आरोपी हे फिर्यादी यांच्या बसची तलवार, लाकडी दांडक्याने तोडफोड करीत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना विरोध केला असता आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली.

फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. आरोपींनी फिर्यादी यांच्या दोन बसची तोडफोड करून नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.