Moshi News : तरूणाला लुटणारे दोन चोरटे जेरबंद

एमपीसी न्यूज –  रस्त्याकडेला मोबाईलवर बोलत असणार्‍या (Moshi News) तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील सोनसाखळी व रोकड लुटून नेणार्‍या दोन चोरट्यांना पोलीसांनी गजाआड केले. मोशी – आळंदी बीआरटीएस रस्त्यावर सस्तेवाडी येथे ही घटना घडली.

योगेश आत्माराम घाटूळकर (वय 24, रा. केळगाव, आळंदी), माधव पंढरी ताले (वय 26, रा. आळंदी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. संजय भऊलाल गडकर (वय 39, रा. गायकवाड वस्ती, मोशी) यांनी भोसरी – एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News : हिच खरी मैत्री! पोलिस मित्राच्या मृत्यू नंतर मित्रांनी जमा केले 11 लाख रुपये

फिर्यादी गडकर हे 7 फेब्रुवारी रोजी मोशी – सस्तेवाडी येथे चौधरी ढाब्यासमोर दुचाकी रस्त्याकडेला थांबवून मोबाईलवर बोलत होते. यावेळी आरोपी योगेश व माधव हे मोटारीतून आले. इथे काय करतो, आम्ही काय बोलतो, याकडे लक्ष देता येत नाही का, असे म्हणून मारहाण केली. (Moshi News) त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोकड असा 26 हजाराचा ऐवज लुबाडून नेला. गडकर यांनी त्वरीत हा प्रकार पोलीसांना कळविला. पोलीसांनी मोटारीच्या क्रमांकावरून तपास करत चोरट्यांना जेरबंद केले. फौजदार चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.