Uddhav Thackeray : ‘पाकिस्तानही सांगेल की शिवसेना कुणाची?

एमपीसी न्यूज : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगावमध्ये आज जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे गटासह गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर देखील  जोरदार टीका केली. पाकिस्तान सुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. पण आपल्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. मात्र, तो त्यांचा दोष आहे”.

उद्धव ठाकरे म्हणाले, ”या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यानंतर हे कळतं की शिवसेना कुणाची आहे. पाकिस्तान सुद्धा सांगेल की शिवसेना कुणाची आहे. पण आपल्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. मात्र, तो त्यांचा दोष आहे”.

”त्यानंतर काही जणांना वाटलं की ते म्हणजेच शिवसेना मग काय म्हणाले की आम्ही सभेत घुसणार आहोत, आम्ही अशा घुसा खूप पाहिल्या आहेत. पण या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीत दाखून द्यायचं आहे’, असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांवरही टोला लगावला.

”40 गद्दार गेले तरी काही फरक पडत नाही. पण एक निष्ठावंत गेल्यावर फरक पडतो. आजही आर ओ तात्यांची उणीव भासवते. निवडूण दिलेले गद्दार झाले आहेत. (Uddhav Thackeray) मात्र, निवडून देणारे आजही माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे या गद्दारांना जसं आपण घोड्यावर बसवलं, तसंच खाली खेचण्याची वेळ आली आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

Pimpri : पीएमपीएलच्या वर्धापनदिनानिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन 

‘आता हे उलट्या पायाचं सरकार आलं आहे. उलट्या पायाचं सरकार राज्यात आल्यापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळीने नुकसान झालेल्यांना भरपाई देखील अद्याप मिळाली नाही. माझ्याकडे शेतकऱ्यांनी टोहो फोडला”.

”आता जर त्यांना व्यासपीठावर आणलं तर त्यांनाही हे सरकार अटक करतील. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना लगेच अटक करण्यात येते. खरं तर खरं बोललं तर अटक करण्यात येते”, असं म्हणत भाजपवर टीका केली.

आईच्या कुशीवर वार करणारी अवलाद आमची असु शकत नाही. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते. पण ही साधीसुधी ढेकणं नाहीत, तुमच रक्त पिऊन ठसठशीत फुगलेली ही ढेकणं आहेत. (Uddhav Thackeray) ही ढेकणं मारायला एक बोट पुरेसं आहे. काहीही माझ्याकडे नसताना तुम्हीं आलात याच मला आश्चर्य वाटतं. तुम्हीं आलात कारण तुम्हीं घेणारे नाहीत आशीर्वाद देणारे आहात. दोन-पाच इकडे तिकडे गेले असतिल पण हे लाखो करोडो हात माझ्यासोबत आहेत, कुणाची हिंमत आहे माझा केस देखील वाकडा करण्याची, येऊन दाखवा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.