Pune News : उज्वला गॅस सिलींडर परवडत नसल्याने मोदी यांना परत करणार- सव्वालाखे

गॅस दरवाढीविरोधात पुण्यात आंदोलन

एमपीसी न्यूज – उज्वला गॅसची सबसिडी बंद केल्याने गरीब महिलांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. हे उज्वला योजनेचे गॅस सिलिंडर परत करून मोदी सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी रविवारी केली.

गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर महिला कॉंग्रेसच्यावतीने रविवारी पुण्यात अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व संध्याताई सव्वालाखे, पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा पूजा मनीष आनंद यांनी केले. त्यावेळी सव्वालाखे बोलत होत्या.

कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत गॅस सिलिंडरची किंमत 400 रुपये होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही किंमत एक हजार रुपयांपर्यंत नेऊन ठेवली. उज्वला गॅस योजनेतून गरीब महिलांनी सिलींडर घेऊन चुली बंद केल्या. या गरीब महिलांवर पुन्हा स्वयंपाकासाठी चुलीकडे वळावे लागले. त्या महिलांची फसगत झाली, अशी टीका पूजा आनंद यांनी केली.

या आंदोलनात पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह संगीता तिवारी, उज्वला साळवे, वैशाली मराठे, लता राजगुरु, सुजाता शेट्टी, इंदिरा अहिरे, सीमा सावंत, स्वाती शिंदे, पल्लवी सुरसे, अस्मिता शिंदे, शोभा पणीकर आदी सहभागी झाल्या होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.