Pune Corona Update : कोरोना रिकव्हरी रेटची मजल! शहरात नवीन 3 हजार 959 कोरोना रुग्णाची नोंद; 3,067 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहे. शहराच्या विविध भागातील नवीन 3 हजार 959 कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 3 हजार 067 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

कोरोनामुळे शहरातील सहा रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 147 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 63 हजार 508 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 35 हजार 073 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 959 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 15 हजार 630 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 41 लाख 22 हजार 244 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात सध्या कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढता – उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.