Credit Card : क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने कर सल्लागार तरूणाला गंडा

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्ड (Credit Card) अपग्रेड करण्याच्या बहाण्याने कर सल्लागार तरूणाला गंडा घालण्याचा प्रकार हिंजवडी येथे समोर आला आहे. फ्रॉड लिंक पाठवून त्याच्या खात्यातील 98 हजाराची रोकड काढून फसवणूक केली.

अनिल जगदिश परदेशी (वय 33, रा. हिंजवडी अपार्टमेंट, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजीतकुमार (पूर्ण नाव-पत्ता समजू शकला नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिल हे गेल्या पाच वर्षापासून संभाजीनगर येथील एका कंपनीत ऑनलाईन पद्धतीने कर
सल्लागार म्हणून काम करतात. 1 जून रोजी फिर्यादी अनिल यांना सुजीतकुमार या नावाने मोबाईलवर कॉल आला. त्याने अनिल यांचे इंडसलंड बँकेचे क्रेडीट कार्ड अपग्रेड (Credit Card) करायचे असल्याचे सांगितले. त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर एक फ्रॉड लिंक पाठवली.

Akurdi News: जुन्या भांडणावरुन टोळक्याची दोघांना लोखंडी रॉड, बेल्ट, सिमेंटच्या गट्टुने मारहाण

या लिंकवर अनिल यांनी क्लिक करताच त्यांच्या खात्यातून दोन वेळा एकूण 98 हजार 390 रूपये गुरगाव या नावावर ट्रान्सफर झाले. पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.