Pune : बेशिस्त वाहनचालकाने वाहतूक कर्मचा-याचा फोडला मोबाईल; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाहतूकीचे नियम मोडून कारवाईदरम्यान वाहतूक कर्मचा-याशी हुज्जत घालणा-या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची घटना काल शुक्रवारी (दि.19) दूपारी 12 च्या सुमारास डेक्कन येथील यशवंतराव चव्हाण पुल चौकात घडली. वाहतूक कर्मचा-याचा मोबाईल आरोपींनी फोडला.

याप्रकरणी डेक्कन वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार आर.जी.परदेशी यांनी फिर्याद दिली आहे. प्रमोद नागेश मेल्लेलु (वय 22, रा. हडपसर), सिम्रन नासीर शेख (वय 21, रा. इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन येथील यशवंतराव चव्हाण पुल चौकात प्रमोद आणि सिम्रन शेख यांनी त्यांची दूचाकी वाहतुकीच्या नियमांचा भंग करून तेथील सिग्नल जंप केला. त्यामुळे फिर्यादीने त्यांना आडवले व त्यांच्यावर कारवाई करत असताना प्रमोद आणि सिम्रन यांनी त्यांच्यावर कारवाई करू नये म्हणून फिर्यादीशी हुज्जत घालून तेथे आरडोओरडा करत त्यांच्याशी वाद घातला. त्याचवेळी फिर्यादी त्यांच्या मोबाईल मधून त्याचा व्हिडिओ शूट करताना दिसताच त्यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून त्यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला व रोडवर फेकून दिला.

याप्रकरणी प्रमोद आणि सिम्रन या दोघांना पोलिसांनी अटक केली, असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.