Aadhaar Card Update : 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करा, अन्यथा शैक्षणिक लाभ विसरा

एमपीसी न्यूज : अनुदान सुरू होणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. (Aadhaar Card Update) त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. आधार अपडेट झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना अनुदान वितरीत केले जाणार आहे.

राज्यातील अनुदानाच्या कक्षेत येणाऱ्या शाळा-महाविद्यालयात कार्यरत शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी संच मान्यता गरजेची आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना दिला जातो त्यांचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. त्याचबरोबर आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे अनुदान मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अनुदानास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय पोषण आहार त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तके व अन्य सरकारी योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे आधार कार्ड 30 एप्रिलपर्यंत अपडेट करणे आवश्यक आहे.

Pune : फुरसुंगी येथील दुचाकी शोरूममधून चोरट्यांनी पळवल्या चार दुचाकी

सरकारी शैक्षणिक योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे आधार अपडेट करणे अनिवार्य आहे. शालेय गणवेश, शालेय पोषण आहार योजना, मोफत पाठ्यपुस्तके आणि इतर शासकीय लाभाच्या (Aadhaar Card Update) योजनांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता येण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे बंधनकारक केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाल्याशिवाय शाळांना अनुदान मिळणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.