Maval : पोलिसांशी अरेरावी करत सरकारी कामात अडथळा

एमपीसी न्यूज – दुचाकीला धडक दिलेल्या रिक्षा चालकावर कारवाई करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून त्यांना अरेरावी आणि धक्काबुक्की केली. (Maval) याप्रकरणी रिक्षाला चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. ३) रात्री सव्वा दहा वाजता चांदखेड येथे घडली.

विनोद गायकवाड (वय 38, रा. बेबडओहळ, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव दांडेकर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Aadhaar Card Update : 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करा, अन्यथा शैक्षणिक लाभ विसरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना चांदखेड जवळ दोन वाहनांचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. त्यानुसार त्यांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता रिक्षा चालक विनोद हा एका दुचाकीवरील दोघांना शिवीगाळ करत होता.

त्यामुळे फिर्यादी यांनी रिक्षा चालकाला हटकले.(Maval) त्यानंतर रिक्षा चालकाने फिर्यादी यांना अरेरावी, शिवीगाळ करत दमदाटी केली. फिर्यादी यांच्या अंगावर धावून येत स्वतःच्या रिक्षावर डोके आपटून घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.