Vaccination : महाराष्ट्रात लसीकरण वाढवण्यासाठी सलमान खान जनजागृती करणार ?

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात अधिकाअधिक लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रसिद्ध व्यक्तींना सोबत घेऊन लसीकरणाबाबत जनजागृती आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासारख्या सेलिब्रिटींना पुढे आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत स्वतः माहिती दिली आहे.

एएनआय या वृत्तवाहिनीसोबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या लाटेचा विचार करता धार्मिक नेते, प्रसिद्ध व्यक्तींद्वारे लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहोत. जनजागृती मोहिमेसाठी सलमान खानसारख्या सेलिब्रिटीची मदत घेणार आहोत, असे राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. कोविड लसीकरण जलद गतीने करण्याच्या दृष्टीने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसावरुन 28 दिवसांपर्यंत करता येईल का? याचा फेरविचार करावा, असं राजेश टोपे यांनी मांडविया यांना सुचविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.