Vadgaon Maval : शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने उद्यापासून राजे शिवछ्त्रपती जयंती महोत्सव

एमपीसी न्यूज – शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने वडगाव येथे मंगळवार (दि 10 मार्च) ते गुरूवार (दि 12 मार्च) या कालावधीत राजे शिवछ्त्रपती जयंती महोत्सव 2020 निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात करण्यात आले आहे. शिवजयंती महोत्सवाचे हे 41 वे वर्ष आहे, अशी माहिती शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक भास्कर (अप्पा) म्हाळसकर यांनी दिली.

मंगळवार दि 10/3/2020 रोजी सकाळी 9:00 वाजता शिवप्रतिमेचे अनावरण – वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, अॅड विजय जाधव, शामराव ढोरे, दिलीप म्हाळसकर, विशाल वहिले, राजेंद्र कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, नितीन कुडे, चंद्रजीत वाघमारे, विलास दंडेल आदी मान्यवरांच्या हस्ते होणार असून सकाळी 9 ते 11 यावेळी महाराष्ट्राच्या मातीतील शिवकालीन मर्दानी खेळ – “मानाची दगडी गोटी उचलणे” या कार्यक्रमाचे संयोजन जय बजरंग तालीम मंडळ , वडगाव मावळ यांनी केले असून उदघाटन वडगाव पोलीस स्टेशनचे पी आय सुरेश निंबाळकर व मावळचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पुणे जिल्हा व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने (मावळ तालुका मर्यादित) ‘ राजे छत्रपती शिवाजी महाराज चषक कुस्ती स्पर्धा होणार आहे. दुपारी 3 वाजता उदघाटन खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, आॅलम्पिकवीर मारूती आडकर, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे आदींच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील विविध पक्षातील ज्येष्ठ नेते व तालुक्यातील मान्यवर कुस्तीगीर उपस्थित राहणार आहेत.

बुधवार दि 11 /3/2020 रोजी सकाळी 9:00 वा शिवप्रतिमेचे अनावरण बाळासाहेब म्हाळसकर, चंद्रकांत ढोरे, गोरख ढोरे, नंदकुमार दंडेल, मधुकर वाघवले, निवृत्ती म्हाळसकर, लहू भिलारे आदी मान्यवरांच्या हस्ते होईल.

सायंकाळी 6:30 वा. श्री पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या सर्व नवनिर्वाचित विश्वस्तांचा सत्कार माजी आमदार दिगंबर भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, पवन मावळ दिंडी समाज अध्यक्ष रघुनाथ लोहोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबन भोंगाडे आधी मान्यवरांच्या हस्ते होणार असून सायं 7 ते 9 वाजेपर्यंत प्रसिद्ध किर्तनकार व शिवव्याख्याते हभप धर्मनाथ महाराज हांडे यांचे किर्तन होईल. तदनंतर महाप्रसाद होईल.

गुरुवार दि 12/3/2020 रोजी सकाळी 7:00 वा शिवप्रतिमेचे अनावरण मावळ तालुका मनसे अध्यक्ष रूपेश म्हाळसकर यांचे हस्ते होईल. सकाळी 9:00 विविध वयोगटातील स्पर्धा सकाळी 10 :00 वा. निबंध स्पर्धा- लहान गट विषय- अनुक्रमे शिवाजी महाराजांचे बालपण. मोठा गट विषय- जाणता राजा, शिवाजी राजे आज असते तर….वक्तृत्व स्पर्धा- विषय शिवरायांचे बालपण, शिवचरित्र दुपारी 2:00 वाजता भव्य रांगोळी स्पर्धा- लहान गट वय वर्षे 12 पर्यंत आणि खुला गट सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू व विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके/चषक देण्यात येतील. सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी नावनोंदणी कार्यक्रम स्थळी होईल. सायंकाळी 5 : वा शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा
यावेळी राजमाता जिजाऊ पुरस्कार- सौ ताराबाई भाऊसाहेब कडू , सांप्रदायिक पुरस्कार- हभप जयश्री अक्षय येवले (युवा किर्तनकार), कृषीरत्न पुरस्कार- शिवाजी नथुराम लोहर, खेळरत्न पुरस्कार- कु हर्षदा गरूड, कु. रूचिका ढोरे आदी मान्यवरांना पुरस्कार सोहळा वितरण कार्यक्रमात माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री मदन बाफना हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ भगवान पवार, सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, तालुका महिला अध्यक्षा सायली बोत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रात्री नऊ वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरूण वाघमारे, कार्याध्यक्ष योगेश म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख सोमनाथ ढोरे, अतुल राऊत, भुषण मुथा, उपाध्यक्ष रवींद्र म्हाळसकर व आदी पदाधिकारी, संघटक, कायदेशीर सल्लागार आदींनी केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.