Maval : धरणाच्या जॅकवेलमध्ये पडल्याने वडगावमध्ये पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धरणाच्या जॅकवेलमध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन वडगाव मावळ नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) दुपारी जांभूळ येथील धरणात घडली.

शंकर पंडित गुगळे (वय 42, रा. वडगाव मावळ) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शंकर हे मागील 20 वर्षांपासून पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते.

वडगाव शहराला जांभूळ येथील धरणातून पाणीपुरवठा होतो. संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरूच आहे. पाणीपुरवठा हा जीवनावश्यक सेवेत येत असल्याने शंकर हे आपल्या ड्युटीवर कार्यरत होते. बुधवारी दुपारी शंकर धरणाच्या जॅकवेल मधील मोटरला पॅकिंग घालण्यासाठी गेले होते. जॅकवेलमधील फळी तुटल्याने ते जॅकवेलमध्ये पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

शंकर यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे वडगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.