Viman Nagar : पोलिस वेळेवर पोहोचले म्हणून, नाहीतर….

As the police arrived on time, otherwise ...

एमपीसी न्यूज – टिंगरे नगर येथील एका रस्त्यावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडला होता. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर काही वेळातच विश्रांतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीला ससून रुग्णालयात दाखल केले. कोरोनाच्या भीतीने अन्य नागरिक पुढे येण्यास तयार नसताना पोलिस वेळेवर पोहोचले म्हणून त्या व्यक्तीचे प्राण वाचले. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमान नगर येथील टिंगरे नगर मध्ये एक नागरिक बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती एका महिलेने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली होती. माहिती मिळतात विश्रांतवाडी पोलिसांचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या व्यक्तीला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या मार्शलनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला ससून रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी या रुग्णाला तत्काळ आपत्कालीन कक्षात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी संबंधित रुग्ण विषयी चौकशी केली असता पोटात अन्न पाणी नसल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच त्याला कोरोनाही झाला नव्हता. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.