BNR-HDR-TOP-Mobile

Mulshi : माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

ताम्हाणी घाटात संशयास्पदरित्या आढळला शिरसाट यांचा मृतदेह

939
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह संशयास्पदरित्या ताम्हाणी घाटात आढळून आला. सोमवारी (दि. 11) दुपारी पिरंगुट ते लवासा रस्त्यावरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. शिरसाट हे आठ दिवसापासून बेपत्ता होते. भारती विद्यापीठ त्यांचा शोध घेत होते. कुटुंबीयांनी त्यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे.

शिरसाट यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत आढळून आले. त्यावरुन गेल्या दोन दिवसांपासून भारती विद्यापीठ त्यांचा पोलीस शोध घेत होते. सोमवारी दुपारी पिरंगुट ते लवासा रस्त्यावर मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. भारती विद्यापीठ पोलीस व पौड पोलिसांनी हा मृतदेह दरीतून वर आणला. त्याच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांची ओळख पटली.

विनायक शिरसाट हे शिवणे उत्तमनगर परीसरात राहायला होते आरपीआयच्या उपाध्यक्षपदावर राहून ते सामाजिक कार्य करीत होते. वडगाव धायरीसह परिसरातील अवैध बांधकामाविरूद्ध माहिती अधिकाराच्या कायद्यातून त्यांनी आवाज उठवला होता.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.