Vishwajit Kadam : मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही- विश्वजीत कदम

एमपीसी न्यूज -राज्यातील काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण (Vishwajit Kadam)यांनी काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत काँग्रेसचे इतर आमदारही जातील अशी चर्चा सुरु आहे.

त्यात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचेही नाव समोर आले होते.

Pimpri : काेट्यवधी खर्चूनही वृक्षगणना अहवाल प्रसिध्द नाही; माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन

पण यावर विश्वजीत कदम यांनी व्हिडीओ च्या माध्यमातून आपण पक्ष सोडत नसल्याचं (Pune)सांगितलं आहे. विश्वजीत कदम म्हणाले अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे वेदना झाल्या आहेत. पण मी राजीनामा दिलेला नाही.

पलूस कडेगाव च्या लोकांनी मला राजकीय जीवनात सेवेची संधी दिली त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतही पाऊल टाकणार नाही.असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर विश्वजीत कदमही त्यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.