Wakad : पाच दुचाकी चोरांकडून 43 दुचाकी जप्त, वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड पोलीसांनी (Wakad) पाच दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 21 लाख 50 हजार रुपयांची तब्बल 43 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे आरोपी चोरीच्या दुचाकी दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन विकत होते. या कारवाईमुळे दुचाकी चोरांचे मोठे रॅकट उघडकीस आले आहे.

नितीन राजेंद्र शिंदे (वय 20 रा. रा. शेकापुर शिंदेवस्ती, ता. आष्टी, जि. बिड) नवनाथ सुरेश मुटकुळे वय (वय 24 रा. थेरगाव पुणे मुळ रा.पाथर्डी जि.अहमदनगर) , ऋषीकेश अजिनाथ भोपळे (वय 23 रा. आष्टी जि.बिड) अमोल दगड पडोळे ( वय 24 रा. केळसांगवी ता. आष्टी जि. बिड) , केशव महादेव पडोळे वय 25 रा. बोडकेवाडी, माण, मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरांचा तपास घेत असताना वाकड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना बातमी मिळाली की, तापकीर मळा चौक येथे एक मोटार सायकल चोर हा चोरीची मोटार सायकल विक्री करता येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नितीन शिंदे याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटार सायकल ही त्याने रहाटणी भागातून चोरी केली असल्याचे व त्याबाबत वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असल्याचे उघडकीस आले. मात्र या टोळीचा मुख्य सुत्रधार हा शिंदे नसून केशव पडोळे होता जो इतर आरोपींच्या मदतीने दुचाकी चोरत होता. पोलिसांनी इतर आरोपींनी बीड, अहमदनगर येथून अटक केली आहे.

त्यांच्याकडून वाकड पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 14, हिंजवडी हद्दीतील 4, बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतील 7, राजणगाव पोलीस ठाणे 3 गुन्हे, अहमदनगर कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील 2, बारामती शहर, वाळुज एमआयडीसी, पाथर्डी, कोतवाली, कर्जत, श्रीगोंदा पोलीस ठाणेकडील प्रत्येकी 1 असे एकुण 36 गुन्हे केल्याचे उघडकीस आणले असून सदर गुन्हयातील 36 मोटर सायकल व इतर 7 चोरीच्या मोटार सायकल अशा एकूण 43 चोरीच्या मोटर सायकल असा एकूण 21 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांचेकडून (Wakad) हस्तगत करण्यात आलेला आहे.

उघड 36 गुन्हयांव्यतिरिक्त त्यांचेकडुन हस्तगत केलेल्या इतर 7 मोटर सायकल पुढील प्रमाणे असून 1 ) बजाज प्लॅटीना MH 12 GY 5650, 2) मेस्ट्रो MH 14 GP 4416, 3) बजाज पल्सर MH 14 AA 9679, 4) हिरो | स्प्लेण्डर MH 31 BD 3608, 5) होंडा युनिकॉर्न MH 14 HF 6391, 6) होंडा शाईन MH 12 MK 5481, 7) होंडा अॅक्टिवा MH 23 AZ 3373 या सर्व मोटार सायकल बाबत माहीती काढून अधिक तपास चालू आहे.

दुचाकी खेरदी करणाऱ्या 17 जणांवरही होणार कारवाई

आरोपी मोटर सायकल चोरुन त्या दुसऱ्या जिल्हयात विकत होते व काही नागरिक मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता स्वस्तामध्ये मिळतात म्हणुन चोरीच्या मोटर सायकल विकत घेत आहेत. चोरीच्या मोटार सायकल आहेत हे माहित असतानाही ते विकत घेतल्यामुळे करुन एकुण 17 इसमांवर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी दक्ष व जागरुक राहुन मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता कोणतेही वाहन विकत घेवु नये तसेच कोणी अशा प्रकारे कागदपत्रे नसताना मोटर सायकल विकत असल्याबाबतचा प्रकार निदर्शनात आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन  केले आहे.

Pavana Sahakari Bank : पवना बँक लोकांची बँक, पारदर्शक कारभारामुळे बँकेची प्रगती – ज्ञानेश्वर लांडगे

हि कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक गुन्हे-1 संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे, सपोनि संतोष पाटील, सपोनि. संभाजी जाधव, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो विभीषण कन्हेरकर, सहायक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोहवा. संतोष बर्गे, पोलीस हवालदा बंदु गिरे, संदीप गवारी, दिपक सावळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, पोलीस नाईक प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोलीस शिपाई अजय फल्ले, तात्या शिंदे, कीर्तेय खराडे, भास्कर भारती,. स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर,सागर पंडीत (परिमंडल – 2 कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.