Wakad Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणावर खुनी हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) रात्री आठ वाजता रहाटणी येथे गोविंदधाम सोसायटीच्या शेजारील मैदानात घडली.

रोहन राहुल शिंदे (वय 20, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय तलवारे (रा. थेरगाव), सुनील उर्फ शेट्टी विश्वनाथ ठाकूर (वय 23, रा. श्रीनगर, रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे आणि आरोपी यांच्यात एक महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याच्या रागातून आरोपींनी बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास शिंदे याच्यावर खुनी हल्ला केला.

आरोपी विजय याने काठी, दगडाने तोंडावर, डोक्यात आणि छातीवर मारले. तर आरोपी सुनील याने काठीने मारून गळा दाबून शिंदे यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.