Wakad Crime News : दुचाकी आडवी लावल्याच्या कारणावरून तरुणाच्या बोटाचा आणि कानाचा चावा

एमपीसी न्यूज – दुचाकी आडवी लावल्याच्या कारणावरून एका तरुणाने दुचाकीस्वाराच्या बोटाला आणि कानाला चावा घेतला. तसेच शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 3) सकाळी आण्णाभाऊ साठे नगर, वाकड येथे घडली.

राजू सिद्राम रणदिवे (वय 40, रा. आण्णाभाऊ साठे नगर, वाकड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश महादेव माडवकर (वय 21, रा. आण्णाभाऊ साठे नगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोरून जात होते. त्यावेळी त्यांनी आरोपीच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी घातली. त्यावरून आरोपी आकाश याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली.

उजव्या हाताच्या बोटाला आणि डाव्या कानाला चावा घेऊन फिर्यादी यांना जखमी केले. त्यानंतर आरोपीने हातात तलवार फिरवून ‘तुला आत्ता खल्लास करतो’ अशी धमकी दिली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.