Wakad : दोन तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाठलाग करून तरुणीचा एकाने विनयभंग केला. तसेच तिच्या मैत्रिणीशी गैरवर्तन केले. हा प्रकार शनिवारी (दि. 29) सकाळी साडेसात ते पावणेबाराच्या दरम्यान थेरगाव व सांगवी येथे घडला.

महेंद्र तुकाराम खरात (रा. पडवळनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी तरुणीचा थेरगाव ते सांगवी दरम्यान पाठलाग केला. ‘तू मला खूप आवडतेस’, असे म्हणून गैरवर्तन करून तरुणीचा विनयभंग केला. तसेच तिच्या 21 वर्षीय मैत्रिणीशी देखील आरोपीने गैरवर्तन केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.