Wakad : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर खुनी हल्ला; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – चारित्र्याचा संशयावरून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 20) पाहटे चारच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला झोपली असताना आरोपीने त्यांना जागे करून ‘तुझे बाहेर काय चालले आहे, तेरा किसके साथ संबंध है, मुझे सब मालूम है’ असे म्हणत डोक्यात दगडाने मारहाण केली. यामध्ये महिलेच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III