Wakad: व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला हॉटेलमध्ये बोलावून केला विनयभंग

एमपीसी न्यूज – व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला बोलावून घेऊन हॉटेलातील खोलीत तिचा विनयभंग केला. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.

अमित सत्यम (वय 28, रा. भुमकर चौक, वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सत्यम याने 27 एप्रिल रोजी व्यवसायाच्या बहाण्याने महिलेला वाकड येथे बोलावून घेतले.

भुमकर चौकातील एस. आर. रूम्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या हॉटेलातील खोलीत ते थांबले असताना सत्यम याने तिचा विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.