Wakad : निगडी, वाकड परिसरात पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज, शुक्रवारी (दि. 20) निगडी आणि वाकड परिसरात रूटमार्च केला. ‘एनआरसी’, ‘सीएबी’च्या विरोधात देशभर होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला आहे. ठिकठिकाणी पोलीस रूटमार्च करीत आहेत.

सकाळी निगडी परिसरात रूटमार्च करण्यात आला. ओटास्किम, चिखली या भागातून रूटमार्च काढण्यात आला. त्यानंतर, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी चौकी, तापकीर चौक, नढे नगर या भागातून रूटमार्च काढण्यात आला. यामध्ये पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, शैलेश गायकवाड, सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, एसआरपीएफ आणि आरसीएफचे 100 कर्मचारी सहभागी झाले होते.

एनआरसी आणि सीएबी च्या विरोधात देशभर आंदोलने सुरु आहेत. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात शांतता राहावी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. शुक्रवारी दुपारी विविध संघटना पिंपरी चौकात एकत्र येणार आहेत. या संघटनांच्या पदाधिका-यांशी बैठकी घेऊन त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. संबंधित संघटनांच्या पदाधिका-यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.