Wakad : घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दाराचा कडी-कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममधील मंगळसूत्र, साखळी आणि घड्याळ असा एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) वाकड येथे उघडकीस आली.

आनंद अशोक टेकाळे (वय 36, रा. प्रियानंद निवास, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद यांचे घर 20 ते 23 सप्टेंबर या कालावधीत कूलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोररट्याने दाराचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घराच्या बेडरुमधील लोखंडी कपाटात ठेवलेले 54 हजार रुपये किंमतीचे 18 ग्रॅमचे मंगळसूत्र, 45 हजार रुपयाचे 15 ग्रॅमचे कर्णफूल, 60 हजार रुपयांची 20 ग्रॅमची सोनसाखळी, मोबाईल व घड्याळे असा 1 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.