BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : भिंतीला लावलेला दरवाजा अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भिंतीला टेकवून उभा केलेला दरवाजा अंगावर पडल्याने 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना बापूजी बुवानगर थेरगाव येथे रविवारी (दि. 9) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

श्लोक निवृत्ती कोंडे (वय 8) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी निरवृत्ती शंकर कोंडे (वय 45) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मदन जाधव, शिवाजी जाधव, जगन्नाथ शिंदे (सर्व रा. बापूजी बुवा नगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांचे एक दरवाजा कोंडे यांच्या घरासमोर धोकादायकरित्या भिंतीला उभा करून ठेवला होता. तो दरवाजा आडवा करून ठेवण्याची कोंडे यांनी वेळोवेळी विनंती केली. मात्र, आरोपींनी त्याकडे लक्ष दिले नाही.

रविवारी सायंकाळी श्लोक त्यांच्या घरासमोर खेळत होता. त्यावेळी भिंतीला लावून ठेवलेला दरवाजा त्याच्या अंगावर पडला. यामध्ये श्लोकचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2