Wakad : पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकावले

एमपीसी न्यूज – पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला फोन करून शिवीगाळ करत एकाने धमकावले. ही घटना 15 ते 29 फेब्रुवारी दरम्यान रहाटणी येथे घडली.

देवा जमादार (रा. किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपीवर 3 फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दिली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादी महिलेला वारंवार फोन करून शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.