Wanwadi : वानवडीत किरकोळ कारणावरून एकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज –  रिजवान शेख आणि त्याच्या साथीदारांनी (Wanwadi ) किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. हडपसर येथील आनंदनगर परिसरातील सभेला हॉटेल जवळ 30 ऑगस्ट च्या रात्री हा प्रकार घडला. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिजवान हैदर शेख, शेख युनूस अन्सार आणि मोहम्मद नजीब इरशाद शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विठ्ठल लक्ष्मण पगारे यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने आनंदनगर येथील सभेला हॉटेल जवळ दुचाकी पार्क केली होती. याच कारणावरून आरोपी रिजवान शेख याने फिर्यादींना आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीच्या मित्राने मी गाडी काढतो तुझा शिवी देण्याचा काही संबंध नाही. असे म्हणाले असता आरोपींनी फिर्यादीच्या मित्राला ओढून जवळच्या कारखान्यांमध्ये नेले.
त्या ठिकाणी धारदार हत्याराने त्याच्या छातीवर बरगडीवर मानेवर आणि पाठीवर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावरही लोखंडी धारदार हत्याराने वार केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Wanwadi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.