Weather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पाऊसाची शक्यता आहे तर, मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: चिपळूण, दोडामार्ग, हरनाई, कणकवली, पेडणे, सांगे 3 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), गुहागर, लांजा, केपे 2 प्रत्येकी, देवगड, कुडाळ, महाड, म्हापसा, मार्मगोवा, राजापूर, रामेश्वर कृषि, रत्नागिरी, वैभववाडी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: महाबळेश्वर, राधानगरी 2 प्रत्येकी, आजारा, गिरना धरण 1 प्रत्येकी.

मराठवाडा: हटगाव 7, देगलूर 5, किनवट, मुदखेड, मुखेड 4 प्रत्येकी, अहमदपूर, औंधा नागनाथ, जळकोट, नायगाव खैरगाव, पूर्णा, रेणापूर, उमरगा 3 प्रत्येकी, अर्धापूर, बिलोली, कळंब, कंधार, लोहा, उमारी, वसमत 2 प्रत्येकी, देवणी, धर्माबाद , गंगाखेड, हिमायतनगर, कळमनुरी, लोहारा, मंजल गाव, सोनपेठ 1 प्रत्येकी.

विदर्भ: रिसोड 4, कळमेश्वर, लोणार 2 प्रत्येकी, वाशिम 1

घाटमाथा: कोयना( नवजा) 4, खोपोली 1

पुढील हवामानाचा अंदाज:

28 सप्टेंबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

29 सप्टेंबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

30 सप्टेंबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

01 ऑक्टोबर: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

27-28 सप्टेंबर: काही नाही.

29 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

30 सप्टेंबर: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

01 ऑक्टोबर: काही नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.