Weather Report: कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Weather Report: Heavy rain warning in rare places in Konkan, Goa and Central Maharashtra कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) (1 सेंमीपेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा: भिरा 8, दोडामार्ग, पणजी (गोवा) 4 प्रत्येकी, कानकोना, कणकवली, मालवण, राजापूर, सावंतवाडी 3 प्रत्येकी, देवगड, जव्हार, महाड, पोलादपूर, केपे, रत्नागिरी, रोहा, वैभववाडी 2 प्रत्येकी, अलिबाग, खालापूर, खेड, कुडाळ, लांजा, म्हापसा, मोखेडा, मुंबई (सांताक्रूझ), पेडणे, रामेश्वर कृषी, संगमेश्वर देवरुख, सांगे, शहापूर, श्रीवर्धन, वेंगुर्ला, विक्रमगड 1 प्रत्येकी.


मध्य महाराष्ट्र: खेड राजगुरूनगर 7, शिरपूर 5, अकोले, धुळे, पुणे 4 प्रत्येकी, गगनबावडा, पेठ, पुरंदर सासवड, सिंदखेडा, सुरगाणा 3 प्रत्येकी, दिंडोरी, एरंडोल, कळवण, महाबळेश्वर, निफाड, ओझरखेडा, पन्हाळा, सतना बागलाण 2 प्रत्येकी, आजारा, आंबेगाव घोडेगाव, बारामती, भोर, चांदगड, दौंड, धरणगाव, गडहिंग्लज, हर्सूल, लोणावाळा (कृषी), मुक्‍ताईनगर / एदलाबाद, मुळदे, नंदुरबार, संगमनेर, शहादा, शाहुवाडी, शिराळा, शिरुर वेल्हे, यावल 1 प्रत्येकी.

मराठवाडा: देगलूर 6, नायगाव खैरगाव, सोयगाव 2 प्रत्येकी, औरंगाबाद, बिलोली, मुखेड, नांदेड 1 प्रत्येकी.

विदर्भ: जळगाव जामोद, नरखेडा, वरोरा 2 प्रत्येकी, अहेरी, अमरावती, अंजनगाव, भद्रावती, चांदूर बाजार, चिखलदरा, एटापल्ली, मूर्तिजापूर, सोलरी, सावनर 1 प्रत्येकी.

घाटमाथा: डुंगरवाडी 21, ताम्हिणी 7, अंबोणे 4, दावडी 3, शिरगाव 2, खंद, कोयना (पोफळी) भिवपुरी, वळवण, शिरोटा, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा) 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

26 जुलै: कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

27 जुलै: कोकण, गोव्यात बहुतांश तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

28 जुलै: कोकण, गोव्यात बहुतांश, विदर्भात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

29-30 जुलै: कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा-

26 जुलै: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

28 जुलै: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

29 जुलै: विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

30 जुलै: कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. तर मुंबईत रात्री आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.