Pune News : का म्हणाले चंद्रकांत पाटील की, मोदींनी वॅक्सिन फ्री दिले, मोदींनी रेशन फ्री दिले ? वाचा..

एमपीसी न्यूज : इंधन दरवाढ सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे त्यामुळे घराच्या वाढत्या किमती कमी कधी होणार असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, इंधनाचे दर वाढले म्हणून दुःखी होणार्‍या माणसांकडे मोदींनी काय दिलं याची देखील एक यादी आहे. 
ते म्हणाले, मोदींनी वॅक्सिन फ्री दिले, मोदींनी रेशन फ्री दिले, मोदींनी दर तीन महिन्याला निराधार महिलांच्या खात्यात पाचशे रुपये टाकले, वृद्धाना एक हजार रुपये, शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले अशी मोठी यादीच आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जर इंधनामुळे नाराज झाले असतील तर त्यांना हे माहित आहे की, महाराष्ट्र सरकारमूळेच इंधनाचे दर जास्त आहे. गोवा आणि गुजरातमध्ये इंधनाचे दर हे आपल्यापेक्षा वीस वीस रुपयांनी कमी आहे, याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांचा टॅक्स कमी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.