Bhosari : पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; पतीवर गुन्हा

Wife beaten with wooden stick; case filed against husband.

एमपीसी न्यूज – पाकीट दाखविण्याच्या कारणावरून पत्नीला लाकडी दांडक्‍याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर परिसरात सोमवारी (दि. 19) रात्री घडली.

गौरी चतरू चव्हाण (वय 26) असे मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. 21) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चतरू बाळू चव्हाण (वय 27, दोघेही रा. निरंकारी मठ, बालाजीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकीट दाखविण्याच्या कारणावरून आरोपी पतीने पत्नीशी भांडण केले. त्यानंतर संतापलेल्या पतीने शिवीगाळ करीत सुरवातीला हाताने व त्यानंतर लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर गौरी यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III