Women beaten : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेला रस्त्यावर मारहाण

एमपीसी न्यूज : भांडणाची तक्रार देण्यासाठी निघालेल्या (Women beaten) महिलेला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी उर्सेगाव येथे घडली.

दिनेश केंडे, विक्रम केंडे, गणेश केंडे, इतर तीन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. शिवणे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेतात आरोपी गणेश याचा बैल आला. बैलाला बांधून ठेवण्यास फिर्यादींनी सांगितले. त्यावरून आरोपी विक्रम याच्या वडिलांनी फिर्यादीस धमकी दिली.(Women beaten) त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि तो मिटला. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सोबत शिवाजी गराडे, रुपाली गराडे, वसंत गराडे असे गाडीतून जात होते. परंदवडी-उर्से रोडने जात असताना त्यांच्या गाडीतील डिझेल संपल्याने ते थांबले. त्यावेळी आरोपी दोन कार मधून आले. त्यांनी फिर्यादीस थांबवून त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली.

Chain snaching : सोमाटणे येथे महिलेचे गंठण पळवले

आरोपी दिनेश याने निवृत्ती गराडे यांच्या मांडीवर लाकडी दांडक्याने मारून गंभीर दुखापत केली. विक्रम याने रुपाली गराडे यांना मारहाण केली.(Women beaten) गणेश याने फिर्यादीस शिवीगाळ आणि दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.