Pune : फेसबुकद्वारे मैत्री करून लग्नाच्या आमिषाने महिलेची 11 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – फेसबुकद्वारे मैत्री करून लग्नाच्या आमिषाने एका महिलेची तब्बल साडे अकरा लाखांना फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 मार्च ते 28 मार्च 2019 या कालावधीत घडली. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व्यक्ती व बँकखातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात मोबाईलधारकाने फिर्यादी तरुणीसह फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाची मागणी घालून कस्टम चार्जेस, दंड आकारणी चलन बदलण्याचे चार्जेस व इन्शूरन्स चार्जेस आदी कारणांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमध्ये 11 लाख 59 हजार 500 रुपये भरायला लावून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.

वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.