World Corona Update: तब्बल 19 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, कोरोनामुक्तांचे प्रमाण 39 टक्के!

World Corona Update: 19 lakh patients overcome corona, recovery rate rises up to 39 percent!

एमपीसी न्यूज – जगभरात गेल्या सात दिवसांत कोरोना मृत्यूंची संख्या सातत्याने खाली येत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. त्यातच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या व टक्केवारी थोडी वाढली आहे. परिणामी जगातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या टक्केवारीत घट सुरूच असल्याचे सकारात्मक संकेत मिळत आहे. कोरोनाच्या जागतिक मृत्यूदरातही सातत्याने घट होत आहे. कोरोनाची सोमवारची आकडेवारी ही जगाला आणखी दिलासा देणारी ठरली आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 48 लाख 94 हजार 222 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 20 हजार 181 (6.54 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19 लाख 08 हजार 065 (39 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 26 लाख 65 हजार 976 (54.47 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 26 लाख 21 हजार 209 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 44 हजार 767 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

12 मे – नवे रुग्ण 85 हजार 315  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 320

13 मे – नवे रुग्ण 88 हजार 220  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 314

14 मे – नवे रुग्ण 96 हजार 334  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 317

15 मे – नवे रुग्ण 99 हजार 405  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 072

16 मे – नवे रुग्ण 95 हजार 518 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 360

17 मे – नवे रुग्ण 82 हजार 257 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 618

18 मे – नवे रुग्ण 88 हजार 858 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 445

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 92 हजारांच्या उंबरठ्यावर

अमेरिकेत सोमवारी 1,003 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 91 हजार 981 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 15 लाख 50 हजार 294 झाली आहे तर 3 लाख 56 हजार 383 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये काल (सोमवारी) 735, जर्मनी 174, इंग्लंड 160, पेरू 141, मेक्सिको 132 तर फ्रान्स व भारतात प्रत्येकी 131 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. इटली 99, रशिया 91, इक्वाडोर 63, कॅनडा 60, स्पेनमध्ये 59 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत ब्राझील आता चौथ्या स्थानावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील, सौदी अरेबिया व चिली या तीन देशांनी वरचे स्थान मिळवले आहे. इंग्लंडला मागे टाकत ब्राझीलने चौथे स्थान मिळविले आहे. सौदी अरेबियाने बेल्जियमला मागे टाकत 15 वे स्थान मिळवले. चिलीने नेदरलँडला मागे टाकत 18 वे स्थान मिळवले आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 15,50,294 (+22,630), मृत 91,981 (+1,003)
  2. रशिया – कोरोनाबाधित 2,90,678 (+8,926), मृत 2,722 (+91)
  3. स्पेन – कोरोनाबाधित 2,78,188 (+469), मृत 27,709 (+59)
  4. ब्राझील – कोरोनाबाधित 2,55,368 (+14,288), मृत 16,853 (+735)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,46,406 (+2,711), मृत 34,796 (+160)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,25,886 (+451), मृत 32,007 (+99)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,79,927 (+358), मृत 28,239 (+131)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,77,289 (+638), मृत 8,123 (+74)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,50,593 (+1,158), मृत 4,171 (+31)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,22,492 (+2,294), मृत 7,057 (+69)
  11. भारत – कोरोनाबाधित 1,00,328 (+4,630) , मृत 3,156 (+131)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 94,933 (+2,660) , मृत 2,789 (+125)
  13. चीन – कोरोनाबाधित 82,954 (+6), मृत 4,634 (+1)
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 78,072 (+1,070), मृत 5,842 (+60)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 57,345 (+2,593) मृत 320 (+8) 
  16. बेल्जियम – कोरोनाबाधित 55,559 (+279), मृत 9,080 (+28)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 49,219 (+2,075), मृत 5,177 (+132)
  18. चिली – कोरोनाबाधित 46,059 (+2,278), मृत 478 (+28)
  19. नेदरलँड – कोरोनाबाधित 44,141 (+146), मृत 5,694 (+14)
  20. पाकिस्तान – कोरोनाबाधित 42,125 (+1,974), मृत 903 (+30)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.